Pimpri : हिंजवडीतील मॅरेथॉनमध्ये आयटी कंपन्यांतील महिला कर्मचार्यांचा सहभाग
Updated On:

हिंजवडी : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून हिंजवडी इंडस्ट्रीअल असोसिएशनने आयटी आसोसिएशनशी संलग्न असलेल्या कंपन्यांच्या कर्मचार्यांसाठी 5 किलोमीटर आणि 10 किलोमीटर अंतरावरील मॅरेथोन आयोजित केली.
त्यास नामांकित आयटी कंपन्यांतील हजारों कर्मचार्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यानात पार पडलेल्या या मॅरेथॉनमध्ये दोन हजारांहून अधिक महिला धावपटूंनी भाग घेतला.
मॅरेथॉनला इंडो अॅथलेटिक सोसायटी (आयएएस) यांनी पाठिंबा दर्शविला आणि मोठ्या संख्येने आय ए एस स्वयंसेवकांनी एनजीओ च्या स्वरूपात मेहनत घेत ही मॅरेथॉन यशस्वी केली.
या स्पर्धेचे उद्घाटन हिंजवडी इंडस्ट्रीयल आसोशियशनचे अध्यक्ष कृष्णन सुब्रमण्यम यांनी हिरवा झेंडा फडकावून झाले. तर सर्व फिनिशर्सना सहभागी झाल्याबद्दल पदक व प्रशस्तीपत्रक देण्यात आले.





