Pimpri : गुरूवारी शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद

पिंपरी : शहरातील पाणी पुरवठा व्यवस्थेमध्ये खंड पडू नये यासाठी पाणीपुरवठा यंत्रणेचे देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी गुरूवारी (दि. १२) शहरातील सर्व भागातील सायंकाळचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच शुक्रवारी (दि. १३) देखील सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडील सेक्टर क्रमांक २३ येथील स्थापत्य विषयक तसेच विद्युत विषयक कामे तसेच क्षेत्रीय स्तरावरील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील स्थापत्य विषयक तसेच विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहे.
त्यासाठी गुरुवारी शहरातील पाणीपुरवठा बंद राहिल. तसेच दुसर्या दिवशी सकाळी शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करुन काटकसरीने पाण्याचा वापर करावा असे आवाहन मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी केले आहे.





