खालापूर : कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते अंजरुण गावातील जय भवानी माता मंदिर, शिव मंदिराचा जीर्णोद्धार आणि सुशोभीकरण, सोबत भव्य सभा मंडपाचे भूमिपूजन पार पडले. गावाची खरी शोभा मंदिरातच आहे, म्हणून मंदिराची उभारणी करा. मंदिरातून खरी ऊर्जा मिळते, असे मत आमदार थोरवे यांनी यावेळी मांडले. लोक वर्गणीतून उभ्या राहणाऱ्या मंदिरासाठी आमदार निधीतून दहा लाख रुपये निधी थोरवे यांनी जाहीर करताच ग्रामस्थांनी आमदारांचे आभार मानले. याप्रसंगी बाळाराम म्हात्रे, बालकृष्ण वाघमारे, संजय देशमुख, सुप्रिया जोरकर, उषा रसाळ, राधिका देशमुख, अतुल देशमुख, रोहित विचारे, अमित जगताप, रोहित पाटील, समीर हडप, रविंद देशमुख, विष्णू ठोंबरे, प्रफुल ठोंबरे, राकेश मुळे, आशिष गायकवाड, जयवंत पाटील, राजेंद्र बडगुजर आदी मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.