Pimpri : लोणावळ्याचे तापमान तुलनेत कमी
Updated On:

पिंपरी : दिवसभर वातावरण ढगाळ राहिल्याने मावळ तालुक्यात दिवसभरात अभावानेच सूर्यदर्शन झाले. तर ढगाळ वातावरणामुळे वातावरणातील उकाडा वाढल्याने नागरिक हैराण झाले होते. मात्र, अन्य शहरांच्या तुलनेत लोणावळ्याचे तापमान चार ते सहा अंश सेल्सिअसने कमी होते.
गेली दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. रविवारी (दि.1) लोणावळ्याचे किमान तापमान27.4 अंश सेल्सिअस नोंदविले गेले; तर 29.3 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. अन्य शहरांच तुलनेत लोणावळ्याचे तापमान कमी असल्याचे दिसून आले.





