Pimpri : पालिका हद्दीतील जीबीएस रुग्णांची संख्या पोचली 32 वर

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील जीबीएस बाधित रुग्णांची संख्या 32 वर पोचली आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, जीबीएसच्या पार्श्वभुमीवर प्रत्येक रुग्णालय झोननिहाय एक वैद्यकीय अधिकारी अशा एकूण 8 वैद्यकीय अधिकारी यांची जीबीएस नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे.
तर महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये आवश्यक प्रमाणात लागणार्या औषधांचा साठा उपलब्ध असून, घरोघरी सर्व्हेक्षण अंतर्गत आजपर्यंत 26,160 घरांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.
नागरिकांनी घाबरून न जाता या आजाराची लक्षणे आढल्यास त्वरीत मनपाच्या रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व नागरिकांनी वरील प्रमाणे या आजाराच्या प्रतिबंधासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले आहे.





