Pimpri : भेगडेंबाबत पक्षाची शिस्तभंग समिती निर्णय घेईल
Updated On:

वडगाव मावळ : विधानसभा निवडणुकीवेळी बाळाभाऊंनी आमचे ऐकले नाही. परंतु पक्षाच्या शिस्तभंग समितीकडे तो विषय जाईल व त्या ठिकाणी याबाबत निर्णय होईल, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
वडगाव येथे एका खासगी कार्यक्रमानिमित्त आले असता बावनकुळे यांनी ही प्रतिक्रिया दिली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बाळा भेगडे यांनी महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध काम करीत मावळ पॅटर्न राबविला व अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांचा प्रचार केला.
याबाबत विचारले असता बावनकुळे बोलत होते. बाळा भेगडे भाजपमध्ये आहेत का, या प्रश्नावर थेट उत्तर देणे बावनकुळे यांनी टाळले. परंतु, बाळाभाऊंनी यावेळी आमचे ऐकले नाही.
पक्षाच्या शिस्तभंग समितीकडे हा विषय जाईल व तिथे याबाबत निर्णय होईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.





