Pimpri : डोणवत परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत
Updated On:

खालापूर : तालुक्यातील डोणवत येथे भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत पाहायला मिळत आहे. वावोशी येथील एक गरीब आदिवासी महिला डोणवत येथे घरकाम करून पोट भरते, ती डोणवत गावातील नदीवर कपडे धुण्यासाठी गेली असता तिथे तिच्यावर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला.
कुत्र्याने महिलेच्या तोंडावर हल्ला करून लचका तोडल्याने महिला गंभीररित्या जखमी झाली, तिला स्थानिकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
परंतु या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून भटक्या कुत्र्यांचा आणि पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.





