Pimpri : श्री शिवछत्रपती शिवाजी राजे विद्यालयाचा दहावीचा १०० टक्के निकाल

चिंचवड : चिंचवड येथील विकास शिक्षण मंडळ संचालित श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीचा १०० टक्के लागला आहे. 272 विद्यार्थ्यांपैकी 61 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा अधिक गुण मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.
या परिक्षेत साळुंखे हर्षाली (98.80), प्रतिक सातपुते व स्वराली उंबरकर — (97.40), वेदांत वाघमोडे व अनुष्का थोरात (97) टक्के गुण मिळाले आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष जगदीश जाधव, सचिव संजय जाधव, तसेच संचालक विजय जाधव यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तसेच प्राचार्य बाळाराम पाटील, साहेबराव देवरे, पर्यवेक्षक दत्तात्रय भालेराव, उपमुख्याध्यापक सुषमा संधान, मनीषा जाधव, छाया ओव्हाळ, ज्यू कॉलेज विभाग प्रमुख अविनाश सावंत, तसेच वर्गशिक्षक रमेश ढवळे, अजिनाथ गुराळकर, वासंती पाटील, सुचित्रा झेंडे व फौजीया मोमीन यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.





