Pimpri : श्री कडजाई माता पतसंस्थेचा वर्धापन दिन उत्साहात

वडगाव मावळ : श्री कडजाई माता ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचा २६वा वर्धापन दिन मंगळवारी उत्साहात साजरा झाला. यानिमित्त इंदोरी येथील श्री कडजाई मातेच्या मंदिरामध्ये अभिषेक, पूजा करण्यात आली. तसेच पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी पतसंस्थेचे संस्थापक दशरथ ढोरे, अध्यक्ष सुनील (नाना) भोंगाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत ढोरे, खरेदी विक्री संघाचे संचालक दिलीप ढोरे, माजी सरपंच रमेश घोजगे, उद्योजक प्रशांत भागवत, बाबासाहेब काशीद, कायदेशीर सल्लागार प्रताप शेलार, नवनाथ पडवळ, प्रियांका काशीद, अजय जाधव उपस्थित होते. यासह संस्थेचे सभासद, ठेवीदार, गुंतवणूकदार, हितचिंतक व ग्रामस्थ उपस्थित होते.
पतसंस्थेचे अध्यक्ष सुनील भोंगाडे यांनी संस्थेच्या कार्याबद्दल आणि आर्थिक स्थितीबद्दल माहिती दिली. तर, सामान्यांच्या हितासाठी काम करणारी व सहज कर्ज उपलब्ध करून देणारी पतसंस्था म्हणजे कडजाई माता पतसंस्था असल्याचे गौरवोद्गार प्रशांत ढोरे यांनी काढले.
पतसंस्थेचे संस्थापक दशरथ ढोरे म्हणाले, श्री कडजाई माता पतसंस्था ही ग्रामीण भागातील नंबर एकची पतसंस्था बनविण्याचा आमचा मानस आहे व उपस्थितांचे आभार मानले.





