Pimpri : जप्त वाहने सात दिवसांत सोडवून न्या

कामशेत : कामशेत पोलिसांकडे जप्त केलेली व बेवारस वाहने वाहन मालकांनी सात दिवसांत सोडवून नेण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी केले आहे.
विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेली, अपघातातील बेवारस वाहने पोलीस स्टेशन आवारात पडून आहेत, ती वाहने वाहन मालकांनी कागदपत्रांची पूर्तता करून घेऊन जावीत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. कामशेत पोलीस ठाणे परिसरात ३१ दुचाकी व ८ चारचाकी वाहने ही बेवारस अवस्थेत आहे.
कामशेत पोलीस ठाण्याकडे वाहने ठेवण्यासाठी स्वतंत्र जागा नाही. जप्त केलेली व बेवारस वाहने सध्या रस्त्यालगत उघड्यावर लावण्यात आली असून ऊन-वारा पावसात वाहन खराब होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे वाहन मालकांनी वाहनाची आरसी बूक व आधार कार्ड घेऊन त्वरित पोलीस ठाण्याशी संपर्क करावा व वाहन सोडवून घेऊन जावे, सात दिवसांत वाहन सोडवून न नेल्यास पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पाडून वाहनांचे निर्लेखन प्रक्रिया केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.





