Pimpri : खंडाळा घाटात खासगी बसला आग
Updated On:

खालापूर : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर किलोमीटर ४३ येथे पुणे मार्गिकेवर एका खासगी बसला शुक्रवारी (दि.१७) अचानक आग लागली. या आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली. सुदैवाने अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नाही.
दरम्यान शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. आगीची माहिती मिळताच महामार्ग पोलीस यंत्रणा बोरघाटचे अधिकारी आणि कर्मचारी, खोपोली नगर परिषदेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.
आयआरबी यंत्रणा, देवदूत टीम, खोपोली अग्नीशमन दल, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठीची टीम यांनी आग अटोक्यात आणली व वाहतूक सुरळीत केली. खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे.





