Pimpri : शिवरायांच्या राज्यकारभारात मराठीचा प्राधान्याने वापर – डॉ. देशमुख

लोणावळा : मराठी भाषेचा इतिहास दोन ते अडीच हजार वर्षांचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्यकारभरात मराठी भाषेला अग्रक्रम दिला, असे मत लोणावळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख यांनी व्यक्त केले.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त लोणावळा महाविद्यालयाच्या मराठी विभाग, ग्रंथालय विभाग, सांस्कृतिक विभाग आणि कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने ग्रंथदिंडी व मराठी स्वाक्षरी मोहीम कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
लोणावळा शिक्षण संस्थेचे विश्वस्त सुनील ठोंबरे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे पूजन व शुभारंभ करण्यात आला. यावेळी नारायणभाऊ पाळेकर, डॉ. राजेंद्र देवरे, चांगुणा ठाकर, प्रा. भक्ती अहीर, डॉ. अमर काटकर, डॉ. नितीन बोडके, डॉ. संदीप सोनटक्के, प्रा. भारती देशमुख, प्रा. अनी वर्गीस, डॉ. रंजुबाला चोपडा, प्रा. योगिता मोरे, डॉ. श्रीकांत होगले, पोलीस-पाटील अर्चना देशमुख, ग्रामस्थ विलास इंगुळकर, दीपक राक्षे, उल्हास पाळेकर उपस्थित होते.
डॉ. देशमुख म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनीही मराठी भाषेला आपल्या राज्यकारभारात राज्यकारभाराची भाषा म्हणून मान्यता दिली होती. आज याच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. ग्रामस्थांच्या वतीने नारायण पाळेकर यांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथदिंडीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक प्रा. संतोष शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन सहाय्यक प्रा. संदीप खाडे यांनी, तर डॉ. धनराज पाटील यांनी आभार मानले.





