पिंपरी : रेशन कार्डवरील ई-केवायसीसाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. लाभार्थी मोबाइलवरून ई-केवायसी अॅपद्वारे प्रक्रिया पूर्ण करू शकतात. दरम्यान यासाठी आता रेशन दुकानात किंवा कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही.
मोबाइलवरून मेरा ई-केवायसी अॅप डाऊनलोड करून केवायसी करता येणार आहे. शिवाय केवायसीसाठी 31 मार्चपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. शासनाने गेल्या सहा महिन्यांपासून रेशनकार्डचे ई-केवायसी व्हावे, यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे.
सुरवातीला रेशनकार्डवरील प्रत्येकास रेशन दुकानात जाऊन पॉस मशीनवर अंगठा लावावा लागत होता. मात्र अनेक कार्डधारक नोकरी, व्यवसायानिमित्ताने बाहेरगावी राहत असल्याने त्यांना रेशनकार्ड असलेल्या त्यांच्या गावात येता आले नाही.
दरम्यान, शासनाने आता पुन्हा यास मुदतवाढ दिली आहे 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याचा लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.