Pimpri : शहरात रविवारी एक जीबीएसचा रुग्णाची नोंद

पिंपरी : गुलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या आजाराचे शहरात आतापर्यंत एकुण १८ रुग्ण आढळले असून आज एक नवीन संशयित रुग्णाची नोंद झाली आहे. आतापर्यंत शासकीय आकडेवारीनुसार एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी ६ रुग्णांना बरे करुन घरी सोडण्यात आले असून उर्वरित रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. यापैकी ५ रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत. अशी माहिती महापालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिली आहे.
जीबीएस पाश्वभूमीवर महापालिकेने गृह सर्वेक्षनाकरीता एकूण १६ पथके नेमण्यात आलेली आहेत. प्रत्येक टीममध्ये एक एमपीडब्लू, एक एएनएम व एक आशा कार्यकर्ती आहे. सारथी प्रकल्पाच्या मदतीने ७७५८९३३०१७ हेल्पलाईन आज कार्यान्वित करण्यात आली आहे.
यासाठी ७ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक रुग्णालय झोननिहाय एक वैद्यकीय अधिकारी अशा एकूण ८ वैद्यकीय अधिकारी यांची जीबीएस नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
वयानुसार रुग्णांचा तपशिल
वयोगट – रुग्ण
0-9 4
10-19 १
20-29 २
30-39 २
40-49 २
50-59 ४
60-69 २
70-79 १
आजाराची सर्वसाधारण लक्षणे –
– अचानक पायातील किंवा हातात येणारी कमजोरी किंवा लकवा
– अचानकपणे उद्भवलेले चालण्यातील त्रास किवा कमजोरी
– डायरिया (जास्त दिवसांचा)
नागरीकांनी घ्यावयाची काळजी-
– पिण्याचे पाणी दुषित राहणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. उदा. पाणी उकळून पिणे.
– अन्न स्वच्छ आणि ताजे असावे.
– वैयक्तिक स्वच्छतेवर भर देण्यात यावा.
– शिळे अन्न आणि अर्धवट शिजलेले अन्न मांस (चिकन, मटन) खावू नये.
– नागरिकांनी घाबरून न जाता लक्षणे आढल्यास त्वरीत शासकीय रुग्णालयात जावे.
जीबीएसचे रुग्ण दाखल असलेल्या ५० खाजगी रुग्णालयांची गुगल मीट घेण्यात आले. महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांची यासंदर्भात गुगल मीट घेण्यात आली. यास ८०२ डॉक्टर उपस्थित होते. महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये आवश्यक प्रमाणात लागणाऱ्या औषधांचा साठा उपलब्ध आहे. तसेच शासनाच्या आरोग्य व एनसीडीसी विभागासोबत बैठका घेण्यात आलेल्या आहेत. नागरिकांनी घाबरुन जाण्याची आवश्यकता नसुन आरोग्य विभागाची प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबत तयारी आहे. घरोघरी सर्व्हेक्षण अंतर्गत आजपर्यंत १३,२३२ घरांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.
डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका





