Pimpri : मळवली येथे एकदिवसीय स्वच्छता शिबिर संपन्न

कार्ला : संस्काराचे बीज महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत एकदिवसीय शिबिराचे आयोजन मळवली येथे आयोजित करण्यात आले होते.
प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अनाथ व निराधार मुला-मुलींसाठी काम करणाऱ्या देवले गावाजवळील शिक्षणग्राम संस्थेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकदिवसीय स्वच्छता शिबिरात सहभाग घेतला. संस्थेच्या परिसराची विद्यार्थ्यांनी स्वच्छता केली व दुपारच्या सत्रात संस्थेच्या जवळील ध्यानकेंद्रात विद्यार्थ्यांना ध्यानाचे प्रात्यक्षिक देत महत्व समजाविण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी धनराज पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. शिबिरासाठी संजय साळुंके, रोहन वर्तक, रुपाली गवळी, रघुनंदन मोहिते, दुर्गा ससाने यांनी महत्वाची भूमिका बजावली. यावेळी अॅनी वर्गिस, पौर्णिमा गायकवाड, अनिकेत ढाकोळ उपस्थित होते.





