प्रभात वृत्तसेवा पिंपरी – एका भरधाव ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक एका तरुणीच्या अंगावरच पलटी झाला यामुळे तरुणीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (१२ ऑगस्ट) स्कोडा व्होक्सवॅगन कंपनीजवळ, महाळुंगे ते निघोजे रोडवर घडली.रिया जयप्रकाश सहाणी (१८)असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणात राहुल जयप्रकाश सहाणी (२५, निघोजे, ता. खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गजानन मारुती पानचावरे (३२, उरुळी देवाची जि. पुणे) याला अटक केली आहे.आरोपी गजानन पानचावरे हा आयशर ट्रक (एमएच ०९/ईएम ९०२६) भरधाव वेगात चालवत होता. वळणावर ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने तो पायी जात असलेल्या रिया सहाणी हिच्या अंगावर पलटी झाला. यामध्ये रिया सहाणीचा मृत्यू झाला.