Pimpri News: महिलांचे योगदान समाजासाठी खूप मोठे आहे. एक महिला स्वतः सक्षम झाल्यानंतर ती तिच्या संपूर्ण कुटुंबाला सक्षम करीत असते. त्यामुळे आज प्रत्येक महिला सक्षम व्हावी, यासाठी विविध उपक्रम राबवणे गरजेचे असून त्यासाठी महापालिकेचा समाज विकास विभाग सक्षमपणे कामकाज करीत आहे असे प्रतिपादन उपमहापौर शर्मिला बाबर यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाचे उद्घाटन उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते तसेच माजी आमदार अश्विनी जगताप, विधी समिती सभापती सुजाता बोराटे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती राणी पठारे, डाॅ. श्रद्धा लांडगे, प्रिया बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले त्यावेळी त्या बोलत होत्या. जागतिक महिला दिनाच्या या कार्यक्रमात शहरात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला बचत गटांचा यावेळी सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांनी यावेळी गीतगायन तसेच विविध पारंपरिक नृत्यांचे सादरीकरण केले. सर्ग महिला बचत गट, महिला बचत गट, स्वामी समर्थ महिला बचत गट, नवक्षितिज महिला बचत गट, गृहिणी महिला बचत गट, अस्तित्व महिला बचत गट, श्री तुळजाभवानी महिला बचत गट, कृष्णा महिला बचत गट, रायगड महिला बचत गट, राजमाता महिला बचत गट आराध्या महिला बचत गट, दत्तकृपा महिला बचत गट, मैत्री दिव्यांग महिला बचत गट, क्रांतीज्योती महिला बचत गट, विजयालक्ष्मी महिला बचत गट, समिता महिला बचत गट, दिव्यज्योती महिला बचत गट, मेरूशिखर महिला बचत गट यांचा सन्मान करण्यात आला. उपायुक्त ममता शिंदे यांनी प्रास्ताविक केले तसेच संगणकीय सादरीकरणातून समाज विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहितीही दिली. प्रफुल्ल पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले तर समाज विकास अधिकारी संतोषी चोरगे यांनी आभार मानले. Educational quality : खासगी अनुदानित शाळांत अनागोंदी कारभार; शैक्षणिक दर्जाही खालावला