प्रभात वृत्तसेवा पिंपरी – भरगाव वेगातील दुचाकीने कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना महाळुंगे एमआयडीसी परिसरात शुक्रवारी (दि. १५) सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.भानुप्रताप उजागर सिंह (वय ४१) व रविंद्र अशोक गुप्ता (वय २०) अशी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. विष्णु नित्यानंद तिवारी (वय २६, रा. भांबोली, ता. खेड, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी दुचाकी चालकाचे नाव आहे. विवेक मोतीचंद मुलगा (वय २७, रा. आंबेगाव, पुणे) यांनी याबाबत महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे दोन दाजी आरोपी चालवत असलेल्या दुचाकीवर बसले होते. आरोपी तिवारीच्या निष्काळजी भरधाव वेगातील दुचाकी कंटेनरला पाठीमागून धडकल्याने हा अपघात झाला. आरोपी तिवारीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास महाळुंगे एमआयडीसी पोलीस करीत आहेत.