Pimpri News | धक्कादायक! शिक्षणाच्या दडपणानं संपवली जीवनयात्रा ; काळेवाडीतील हृदयद्रावक घटना
Updated On:

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – अभ्यासाचा ताण सहन न झाल्याने बारावीतील एका विद्यार्थीनीने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली.नंदनी राजकुमार सिंह (वय १७, रा. नखातेनगर, काळेवाडी) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. काळेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदनी ही प्राधिकरणातील केंब्रिज कॉलेजमध्ये इयत्ता बारावीमध्ये शिकत होती.
ती अभ्यासात हुशार होती. मात्र अभ्यासाचा ताण सहन न झाल्याने तिने मंगळवारी रात्री राहत्या घरात गळफास घेतला. ही बाब नातेवाइकांच्या लक्षात येताच तिला त्वरीत वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. काळेवाडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.





