Pimpri News | नदीच्या काठावर खेळणं पडलं महागात! पाय घसरून बालक नदीत बुडाला
Updated On:

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – पाय घसरून पडल्याने एका बालकाचा नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना म्हाळुंगे येथे शनिवारी (दि. २०) दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली.सुनील जालिंदर भोसले (वय १२) असे मृत्यूमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील हा आपल्या नातेवाईक व मित्रासोबत नदीवर गेला होता. खेळत असताना त्याचा पाय घसरून तो नदीत पडला. त्याच्या नातेवाईकांनी त्यास बेशुद्ध अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. बावधन पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.





