Pimpri News | चिंचवडमध्ये विवाहितेची आत्महत्या ; गळफास लावून संपवला जीवनप्रवास
Updated On:

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – राहत्या घरात गळफास घेत एका विवाहितेने आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. १६) सकाळी तानाजीनगर, चिंचवड येथे घडली.रुपाली भूषण महाजन (वय २९, रा. तानाजीनगर, चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अंकुश बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपाली यांचा विवाह बारा वर्षांपूर्वी २०१३ मध्ये झाला. त्यांना एक मुलगा आहे. दोन दिवसांपासून रुपाली या अस्वस्थ असल्याचे तिच्या कुटुंबियांनी सांगितले. मंगळवारी सकाळी सव्वाअकरा वाजताच्या सुमारास त्यांनी राहत्या घरात गळफास घेतला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. चिंचवड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.




