Pimpri News | कामशेत बनतंय अंमली पदार्थांचं अड्डा ? नागरिकांचा संताप, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!

प्रभात वृत्तसेवा
कामशेत ( चेतन वाघमारे ) – कामशेत हे एक एतिहासिक शहर असून मावळ तालुक्यातील एक मोठी बाजारपेठ अशी या शहराची ओळख आहे. कामशेतचा एक वेगळाच नावलौकिक आहे. परंतु अलिकडच्या काळात कामशेतची ओळख बदलत असून नवी ओळख नावाजण्याजोगी नक्कीच नाही. कामशेत आता अंमली पदार्थाचा अड्डा बनत असल्याचे आरोप होत आहेत. येथून अंमली पदार्थांच्या पुरवठा होत असल्याचा आरोप केला जात आहे. अलिकडेच लोणावळा येथे पोलिसांचा जाहीर निषेध करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला होता.
त्या मोर्चाच्या वेळी असाही आरोप करण्यात आला. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे मावळ तालुक्यातील काही तरुण अंमली पदार्थाच्या व्यसनात बेधुंद होत आहेत. मावळ तालुक्यातील तरुणाई व्यसनाधीन होऊ नये, याकरिता आता या मुद्दयावर मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ लागली आहे.कामशेतमधून गांजा व अमली पदार्थ सरसकट पुरवठा करण्याचे काम चालते. कामशेत अनेक कॉलनीमध्ये विभागले गेले आहे. त्या कॉलन्यांमध्ये मोठ्या संख्येने परप्रांतीय भाड्याने राहत आहेत. त्यापैकी बहुतेकांची कुठलीही नोंद अथवा माहिती पोलिसांकडे नाही. तसेच गेल्या काही काळात वाढत असलेल्या अंमली पदार्थांचा वापर यामुळे शंका प्रबळ होत आहे.
कामशेत येथे संशयास्पद व्यक्ती राहत असल्याचेही स्थानिक नागरिक सांगतात. अशावर पोलीस प्रशासन कारवाई करत नाही त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ विक्री केली जात आहे. मागील एक दोन वर्षात लोणावळा ग्रामीणचे आय.पी.एस अधिकारी कार्तिक यांनी मोठ्या प्रमाणात या परिसरात आमली पदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई केली होती पण आय.पी.एस कार्तिक यांची बदली झाल्यापासून ही कारवाई मंदावली आहे त्यामुळे पुन्हा अंमली पदार्थ विकण्यास सुरुवात झाली आहे.
अंमली पदार्थ विक्रीची हालचाल होत आहे ही पोलीस प्रशासन व स्थानिकांमध्ये एक चिंतेची बाब बनली आहे. तर अशा प्रकारची विक्री झाल्यास येथील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात नशेच्या आहारी जाऊ शकतो ही भीती आता नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. मावळातील नागरिकांमध्ये एक मोठे आव्हान आता निर्माण झाले आहे ते म्हणजे या तरुणांना या नशे पासून कशाप्रकारे परावृत्त करता येईल जर हा तरूण वर्ग अशा नशेमध्ये अडकली तर तरुणांचे भवितव्य धोक्यात आहे.
यासाठी पोलीस प्रशासनाने त्वरित कारवाई करून असे अवैध धंदे उध्वस्त केले पाहिजे. ज्या व्यक्ती अशा प्रकारचे अवैध करत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात आली पाहिजे. व कामशेत पुढील नागरिकांनी सुद्धा जागृत राहिले पाहिजे अशा प्रकारचे अमली पदार्थ विक्री व नशा करणारे असतील तर त्यांनी पोलीस प्रशासनाला कळवले पाहिजे व पोलीस प्रशासनाला मदत केली पाहिजे जेणेकरून अशा अवैध धंद्यावर आळा बसेल.
आमदारही आ्क्रमक..
आमदार सुनील शेळके देखील याबाबत आक्रमक झालू असून पुणे ग्रामीण पोलीस दलातील, लोणावळा पोलिसांना थेट इशारा दिलाआहे. पांढरी पावडर कुठे विकते, मटका कुठे चालतो हे आम्ही सांगतो… पण पोलीस मात्र गप्प का?” पोलिसांबद्दल आदर आहे, पण भोंगळ कारभार सहन करणार नाही. पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक संदीप गिल चांगले असले तरी, हा आदर म्हणजे दोष झाकायचं झाकण नाही, असे स्पष्ट केल आहे. मावळ तालुक्याचा महाराष्ट्रात तमाशा होणार नाही तरी पोलीस प्रशासनाने आत्ता तरी गंभीर व्हा. पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगतीवर लोणावळा, खंडाळा शहरातील एन्ट्री-एक्झिट पॉइंटवर वाहतूक पोलीस तपासणी, विकासकामांचा वेग संथ करत असून त्याचा परिमाण पर्यटनावर होत आहे. या प्रत्येक मुद्द्यावर आमदार सुनील शेळके यांनी जाब विचारला.
पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह..
१) कामशेत पोलिसांच्या डोळ्यासमोर अमली पदार्थ गांजा विक्री होत असून सुद्धा कामशेत पोलीस शांत का असा सवाल नागरिकांना पडत आहे.
२) तरुणाई दिवसेंदिवस व्यसनाधीन होत आहे मात्र याकडे पोलीस प्रशासनाचा कानाडोळा होत आहे.
३) मावळ तालुक्यातील शाळेच्या परिसरामध्ये व शहरातील पान टपऱ्यावरती हे अमली पदार्थ सहज रित्या उपलब्ध होत आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांवरती व तरुणाईवर होत आहे.
“मावळ तालुक्यामध्ये कोणाच्या आश्रयाखाली अंमली पदार्थ सर्रासपणे विकले जात आहेत? यांच्या मास्टर माइंडचा शोध घेतला पाहिजे. अमली पदार्थ पूर्णपणे बंद व्हावा यासाठी पुणे ग्रामीण अधीक्षक संदीप गिल यांना निवेदन देणार आहे.”
– अभिमन्यू शिंदे. अंदर मावळ, वडगाव, कामशेत मंडल अध्यक्ष





