Pimpri News | हृदयद्रावक घटना! मित्रांच्या समोरच बुडाला १४ वर्षांचा मुलगा
Updated On:

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – पोहण्यासाठी मित्रांसोबत तलावावर गेलेल्या एका १४ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास वासुली फाटा येथे घडली.शेख सयलु गौस (वय १४, रा. वासुली फाटा, ता. खेड, जि. पुणे) असे बुडून मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास शेख सयलु गौस हा आपल्या मित्रांसोबत पोहण्यासाठी तलावावर गेला होता.
मात्र पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडाला. नागरिकांनी त्यास बेशुद्ध अवस्थेत चाकण येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. महाळुंगे एमआयडीसी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.





