Pimpri : वलवण तलावात बुडून अल्पवयीन मुलाचा मृत्यू
Updated On:

लोणावळा : लोणावळा शहर हद्दीतील वलवण तलावात बुडून एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला आहे. बुधवारी (दि.१२) सायंकाळच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. सिद्धार्थ गणेश गरूड असे तलावात बुडून मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, दोन मित्र एक कायाक घेऊन तलावात उतरली होती. तलावात आत गेल्यानंतर त्यांनी पाण्यात उड्या घेतल्या व पोहोत पोहोत काठावर येऊ लागली. परंतु त्यांची दमछाक झाली व ते बुडू लागले.
त्यावेळी तलावाच्या काठी असलेल्या काही जणांनी मुलांना वाचविण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने एका मुलाला वाचविण्यात आले, परंतु दुर्दैवाने दुसरा अल्पवयीन मुलगा, सिद्धार्थ गरूड याचा बुडून मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच शिवदुर्ग रेस्कू टीम व पोलीस घटनास्थळी आले. शोधकार्य मोहीम राबवून पाण्यात बुडालेल्या मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.





