Pimpri : नायगाव येथे व्यायाम शाळेचे उद्घाटन

कान्हे : ग्रुप ग्रामपंचायत कान्हे – नायगाव यांच्या वतीने राहुल नगर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती श्री संभाजी महाराज व्यायाम शाळेचे उद्घाटन आमदार सुनील शेळके व स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे ह्यांच्या हस्ते करण्यात आले.
नागरिकांना व्यायामाचे महत्व समजावे आणि आरोग्य सुदृढ राहावे, या दृष्टीकोनातून उभारण्यात आलेल्या व्यायामशाळेचा फायदा नक्कीच गावातील तरुण पिढीला होईल. जास्तीत जास्त तरुणांनी या व्यायमशाळेचा उपयोग केला पाहिजे, असे आवाहन आमदार सुनील शेळके यांनी उपस्थितांना केले.
याप्रसंगी सरपंच विजय सातकर, एसआरपीचे तालुकाध्यक्ष बबनराव ओव्हळ, उपसरपंच पूजा चोपडे, सुजात चोपडे, दिपक हुलावळे, संदिप ओव्हाळ, महेश सातकर, सुरेश ओव्हाळ, बाळकृष्ण टपाले, अश्विनी शिंदे, रुपाली कुटे, मनिषा ओव्हाळ, नरेंद्र ओव्हाळ, अरिफ मुलाणी, लहू चोपडे, रोहिणी चोपडे व ग्रामस्थ उपस्थित होते.





