Pimpri : मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर
Updated On:

तळेगाव दाभाडे : श्री भगवान महावीर यांच्या जन्मकल्याणक (जयंती) दिनानिमित्त जैन सोशल ग्रुप व रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी यांच्या वतीने रक्तदान शिबिर व मोफत मोतीबिंदू तपासणी, शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
गुरूवारी (दि.१०) सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत हे शिबिर जैन भवन, तळेगाव दाभाडे येथे आयोजित केले आहे.
रक्त संकलनाचे कार्य गरवारे रक्त पेढी तळेगाव दाभाडे हे करणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमास उपस्थित राहून रक्तदान करून समाजकार्यात सहभाग घ्यावा, असे आवाहन राकेश ओसवाल, डॉ सौरभ मेहता, राजेंद्र शहा, हितेश राठोड यांनी केले आहे.





