Pimpri : पिंपरी चिंचवड रेल्वे प्रवाशांचा अपेक्षाभंग

Union budget 2025 | या केंद्रीय अर्थसंकल्पाने रेल्वेच्या बाबतीत निराशा केली आहे . महाराष्ट्रातून केंद्राला एकूण बजेट पैकी अडतीस टेक्के निधी महाराष्ट्र राज्यातून दिला जातो परंतू पुणे जिल्हा कडे पुर्ण दूर्लक्ष केले आहे. पुणे-लोणावळा दरम्यान लोकल वाढसाठी चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने 1989 सालापासून प्रयत्न करीत आहे. गेल्या 35 वर्षात रेल्वे मंत्री, मध्यरेल्वे महाव्यवस्थापक, रेल्वे बोर्ड यांच्या बरोबर सातत्याने चिंचवड प्रवासी संघ पत्रव्यवहार करीत असताना रेल्वे विभागाकडून अनेकवेळा लेखी पत्र व आश्वासनच मिळाले.
ट्रॅकसंख्या वाढविण्यासाठी पुणे व पिंपरी चिंचवड दोन्ही महापालिका व राज्य शासनाने पुढाकार घेतला असता महाराष्ट्र शासनाने रेल्वेला त्वरीत निधी दिला पाहीजे , तर, पुणे लोणावळा दरम्यान रखडलेले चौपदरीकरण रेल्वे मार्गाचे काम आज मार्गी लागले असते. पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातील खासदार, आमदारांनी देखील हव्या त्या प्रमाणात पाठपुरावा केल्याचे दिसून आले नाही. रेल्वे विभाग देखील दोन्ही महानगरपालिकेचे 625 कोटी रूपये तसेच, राज्य शासनाचा निधी न मिळाल्यामुळे पुणे-लोणावळा चौपदरीकरणाचा प्रश्न सुटू न शकल्यामुळे आज पुणे-लोणावळा दरम्यान प्रवास करणार्या एक लाखांहून अधिक प्रवासीयांची ससेहोलपट होत असून त्यांचा वेळ, पैसा, शारिरीक त्रासाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.
सन 2019 साली चिंचवड येथे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के. शर्मा यांचा चिंचवड रेल्वे स्थानकावर पाहणी दौरा होता. त्यावेळी देखील त्यांना चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने लेखी निवेदन दिले. परंतु, अनेक मागण्याकडे रेल्वे विभागाने दुर्लक्ष केले आहे. आता चिंचवड प्रवासी संघ पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका प्रवासीयांच्या हितासाठी त्यांच्या प्रश्नासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहे.
-गुलामअली भालदार
अध्यक्ष, चिंचवड रेल्वे प्रवासी संघटना





