Pimpri : विभागप्रमुख, शाखाप्रमुख व कर्मचार्यांनी भ्रमणध्वनी सुरू ठेवा

पिंपरी : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, यानिमित्ताने एखाद्या लोकप्रतिनिधीकडून महापालिकेच्या कोणत्याही विभागाशी संबंधित प्रश्न विचारला जाऊ शकतो. ही माहिती तत्काळ राज्य सरकारला दुतामार्फत उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
त्यामुळे महापालिकेच्या विविध विभागांचे प्रमुख, शाखाप्रमुख व संबंधित कर्मचार्यांनी आपले भ्रमणध्वनी व दूरध्वनी सुरू ठेवावेत. तसेच मुख्यालय सोडून बाहेर जाऊ नये, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी दिल्या आहेत.
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चपासून सुरू झाले आहे. या अधिवेशनाच्या कामकाजाच्या अनुषंगाने महापालिकेच्या संदर्भात उपस्थित केलेले तारांकीत, अतारांकीत प्रश्न, आश्वासने, लक्षवेधी सूचना, विशेष उल्लेख सूचना, औचित्याचा मुद्दा याबाबत तसेच केलेल्या कार्यवाहीबाबत शासनाकडून माहिती मागविण्यात येते. महापालिकेशी संबंधित असलेले प्रश्नांची माहिती राज्य सरकारला वेळेत पुरविणे आवश्यक असते. ही माहिती वेलेत शासनाला उपलब्ध करुन घेण्याची दक्षता घ्यावी लागते.
अर्थसंकल्फय अधिवेशनाच्या काळात महापालिकेच्या कोणत्याही विभागाशी संबंधित माहितीची विचारणा होऊ शकते. त्यामुळे याबाबत कोणतीही तत्काळ उपलब्ध करुन देण्यासाठी विभागप्रमुख, शाखाप्रमुख व कर्मचार्यांनी भ्रमणध्वनी सुरू ठेवा. मुख्यालय सोडून बाहेर जाऊ नका. तसेच या काळात रजेवर व सुट्टीवर न जाण्याच्या सूचना खोराटे यांनी दिल्या आहेत.





