Pimpri : भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी

पिंपळे गुरव : दापोडीतील आई गार्डन परिसरात भटक्या कुत्र्यांच्या घोळक्यातील एका कुत्र्याने एका तरुणाच्या पायाचा लचका तोडला. यामुळे पुन्हा एकदा भटक्या श्वानांचा प्रश्न उपस्िथत झाला आहे.
दापोडीतील आई गार्डन परिसरातील मोकळ्या जागेत कुत्र्यांचा घोळका असतो. उद्यान असल्याने येथे नेहमीच नागरिकांची ये-जा सुरू असते. अनेकदा हा घोळका नागरिकांवर आणि वाहनचालकांवर धावून जातात. भर दुपारी प्रकाश म्हस्के नावाच्या २०-२२ वर्षांच्या तरुणाच्या पायाचा लचका तोडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. जर तरुणांवर भटके श्वान हल्ला चढवत असतील तर ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांवर हल्ला केल्यास काय होईल? असा प्रश्न उपस्िथत केला जात आहे.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, दिवसें-दिवस भटक्या कुत्र्यांची समस्या वाढतच चालली आहे. घोळका करुन फिरत असलेली ही मोकाट आक्रमक आणि हिंसक होताना वारंवार दिसून येत आहे. प्रशासनाकडून यांचा बंदोबस्त होत नसल्याने लहान मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना रस्त्याने चालणे अवघड झाले आहे. रात्रीच्या वेळी दुचाकीचालकांच्या मागे धावून श्वान अपघाताचे कारण बनतात. स्थानिक लोकप्रतिनिधी शेखर काटे यांनी सांगितले की, अशा घटनांची पुनरावृत्त होऊ नये, यासाठी प्रयत्न करु.
आम्ही या घटनेने हादरून गेलो आहोत. तरुण मुलाचा पाय रक्तबंबाळ झाला होता. कुत्र्यांना काहीही त्रास न देताही ते आक्रमक होऊन घोळक्याने नागरिकांवर धावून येत आहेत. प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याची गरज आहे.
-विष्णू पाटोळे, स्थानिक नागरिकही घटना दुपारच्या सुमारास घडली . यामुळे लहान मुले आणि ज्येष्ठांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. अचानक श्वानांची संख्या वाढली आहे, या ठिकाणी उद्यान आहे येथे मुले खेळतात. या घटनेमुळे भीतीचे वातावरण आहे.
– दीपक विजागत, स्थानिक नागरिकप्रशासनाकडे यापूर्वीही मागणी केली होती. ते कुत्रे पकडून नेतात, नसबंदी करुन पुन्हा आणून सोडतात. परंतु संख्या वाढतच चालली आहे. लवकरात लवकर कारवाई व्हावी.
-महेश बांगडे, स्थानिक नागरिक





