Pimpri : डी.वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

वडगाव मावळ : डी. वाय. पाटील ॲकॅडमिक एज्युकेशन एक्सिलन्स फेडरेशनचे, डॉ. डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस वराळे येथे ‘उमंग २०२५’ वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचे आयोजन करण्याचत आले होते. महाविद्यालयाचा दुसरा वार्षिक स्नेहसंम्मेलन सोहळा सोमवारी (दि.१०) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
स्नेहसंम्मेलनाच्या माध्यमातून विद्यार्थांच्या कलागुणांना वाव मिळतो, त्यामुळे विद्यार्थ्यांचे हक्काचे व्यासपीठ असते, असे मत संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुशांत पाटील व संस्थेच्या सी.ई.ओ. अॅड. अनुजा पाटील यांनी व्यक्त केले.
दरम्यान महाविद्यालयात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा प्रकारांमध्ये क्रिकेट, बुध्दिबळ, कॅरम, कबड्डी अशा अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमधील सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक, प्रमाणपत्र, चषक व पदक वितरीत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन सौरभ साळुंके (माझा आनंद हरपला गाण्याचे गायक) उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. शिरबहादुरकर यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन सेलेब्रिटी अॅंकर विशाल व आभार प्रदर्शन प्रा. भावना शिंदे यांनी केले. वार्षिक स्नेहसंम्मेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विध्यार्थ्यानी परिश्रम घेतले.





