Pimpri Crime: “पार्टटाइम नोकरी’च्या बहाण्याने महिलेची दीड लाखांची फसवणूक
Updated On:

पिंपरी – पार्टटाइम नोकरी देण्याच्या बहाण्याने एका महिलेची फसवणूक केली. ही घटना 17 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी मारुंजी हिंजवडी येथे घडली. मोबाइल नंबर 7037527960वरील व्यक्ती, परितोष पासवान (रा. पासवान, पो. भवानपुरा, मनोज कार्तिक (भागलपूर, बिहार), ब्रसेर टेक्नोजी प्रा लि यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपींनी फिर्यादी महिलेला 7037527960 या क्रमांकावरून संपर्क केला. त्यांना वर्क फ्रॉम होम नावाखाली एक लिंक पाठवली. त्यामध्ये पैसे गुंतवल्यास पार्ट टाईम नोकरी देतो, असे आरोपींनी फिर्यादी महिलेला सांगितले. महिलेकडून तब्बल एक लाख 38 हजार रुपये आरोपी परितोष याच्या बॅंक खात्यावर घेतले. त्यानंतर महिलेला नोकरी न देता तसेच तिचे पैसे परत न करता तिची फसवणूक केली आहे.




