Pimpri Crime | मोबाईल हॅक झाला, खातं साफ झालं ; वृद्धाची 24 लाखांची आर्थिक फसवणूक”

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – अज्ञात व्यक्तीने वृद्ध व्यक्तीचे मोबाईल हॅक करून त्यांच्या बँक खात्यातून 24 लाख 35 हजार 583 रुपये दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करून आर्थिक फसवणूक केली. ही घटना 3 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर या कालावधीत सोळु, तालुका खेड येथे घडली.या प्रकरणी विठ्ठल निवृत्ती ठाकूर (वय 70, रा. सोळु, ता. खेड, जि. पुणे) यांनी मंगळवारी (दि. २३) आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात आरोपीने फिर्यादीचा मोबाईल हॅक केला आणि त्यांच्या परवानगीशिवाय एचडीएफसी बँकेच्या खात्यातील 70 लाख रुपयांची मुद्दल आणि 6 लाख 63 हजार 916 रुपयांचे व्याज फिर्यादीच्या बचत खात्यात ट्रान्सफर केले. त्यानंतर, 5 सप्टेंबर आणि 6 सप्टेंबर रोजी फिर्यादीच्या खात्यातून एकूण 24 लाख 35 हजार 583 रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर केले. आळंदी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.




