Pimpri Crime :‘सीबीआय’च्या नावाखाली वकिलाकडून कोट्यवधींची उकळपट्टी ; पोलिसांकडून तपास सुरू

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – स्वतःला सीबीआय अधिकारी भासवून आणि बनावट आधारकार्डचा गैरवापर करत आरोपींनी एका वकिलाला मनी लॉन्ड्रींगच्या खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली. या भीतीपोटी वकिलाने वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण १ कोटी ८० लाख ३७ हजार रुपये भरले. ही घटना ४ सप्टेंबर १९ सप्टेंबर या कालावधीत उद्यमनगर, पिंपरी येथे ऑनलाइन पद्धतीने घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीला व त्यांच्या पत्नीला फ्रॉड केसमध्ये कारवाई करून अटक करण्याची तसेच कोणाला काही सांगितल्यास त्यांनाही अटक करण्याची भीती घातली. त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाचे बनावट पीडीएफ पाठवून विश्वास संपादन केला. खात्यावरील रक्कम व्हेरिफाय झाल्यानंतर परत करण्याचा विश्वास देऊन फिर्यादीकडून जबरदस्तीने एकूण १ कोटी ८० लाख ३७ हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांवर भरण्यास भाग पाडले.





