प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या आरोपीला शस्त्रासह अटक करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी (दि. ३०) पहाटे भोसरी वाहतूक विभागाच्या कार्यालयासमोर कासारवाडी येथे करण्यात आली.शकिल करीम शेख (वय २८, रा. नांगरे चाळ, कासारवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल नितीन बरकडे यांनी मंगळवारी (दि. ३०) दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड पोलिसांनी आरोपी शकील शेख याला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वीच तो कोणतीही परवानगी न घेता तो शहरात आला. त्याने स्वतःकडे कोयता हे शस्त्र बाळगले. याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी सापळा लावून शकील याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला आहे.