Pimpri Crime | पगारासाठी ठेवला, पण विश्वासघात केला! अकाउंटंटकडून कंपनीला लाखोंचा फटका

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – एका अकाउंटंटने ग्राहकांकडून मिळालेली १० लाख ५७ हजार रुपयांची रक्कम कंपनीच्या खात्यात जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरून कंपनीची फसवणूक केली. ही घटना २०२३ पासून १४ एप्रिल २०२५ दरम्यान चिंचवडमधील लक्ष्मी कॉम्प्लेक्स येथे घडली.राेहित खुशालराव पुरी (वय ३६, रा. आकुर्डी) यांनी मंगळवारी (दि. १६) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रोहन विलास अजिंक्य (वय ३६, ३८, रा. तळेगाव दाभाडे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या डी.सी.सी. इन्फोटेक कंपनीमध्ये आरोपीला अकाउंटंट म्हणून नेमण्यात आले होते. त्याने १५ ग्राहकांकडून १० लाख ५७ हजार ७७९ रुपये रोख रक्कम घेतली. ग्राहकांना पैसे जमा झाल्याची पावतीही दिली, परंतु ही रक्कम कंपनीच्या बँक खात्यात जमा केली नाही. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.




