पिंपरी : 57 केंद्रांवर मिळणार कोव्हिशिल्ड लस

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये करोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. महापालिकेकडील लसीचा साठा संपल्याने गुरुवारी सर्व लसीकरण केंद्रे बंद ठेवण्यात आली होती. मात्र. आज (दि. 21) शहरातील 57 केंद्रांवर कोव्हिशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस मिळणार आहे. तर दोन केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस देण्यात येणार आहे.
शनिवारी (दि. 21) शहरातील 18 ते 44 वर्ष व 45 वर्षांवरील नागरिकांना 57 केंद्रावर कोव्हिशिल्ड लस दिली जाणार आहे. त्यापैकी 21 केंद्रांवर 10 लाभार्थी हे कोविन ऍपवर ऑनलाइन स्लॉट बुकिंग पद्धतीने व उर्वरित किऑस्क टोकन प्रणालीद्वारे टोकन घेतलेल्या लाभार्थ्यांना लस देण्यात येणार आहे.
प्रभागातील 9 केंद्रावर ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पद्धतीने लस देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शहरातील इतर 28 केंद्रांवरही ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन करून लस देण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल शिवतेज नगर यमुनानगर व मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल येथे कोव्हॅक्सिन लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहे. सर्व केंद्रावर सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत लसीकरण केले जाणार आहे. कोविन ऍपवर नोंदणी करण्यासाठी बुधवारी (दि. 18) सकाळी 8 वाजता स्लॉट बुकींगसाठी ओपन होतील. महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल.
तसेच महापालिकेच्या आठ लसीकरण केंद्रावर गरोदर महिलांसाठी काही डोस राखीव ठेवण्यात येतील.





