Pimpri : सदस्यांच्या पतवाढीसाठी सहकारी संस्थांनी उपक्रम राबवावेत

वडगाव मावळ : सहकारी संस्थांच्या व्यवस्थापन सदस्यांनी आपल्या गरजू सदस्यांची पत वाढविण्यासाठी विशेष उपक्रम हाती घ्यावेत, असे प्रतिपादन आमदार सुनील शेळके यांनी बेबडओहोळ येथे केले. प्रेरणा मल्टीस्टेट अर्बन को ऑफ क्रेडिट सोसायटीच्या मावळ तालुक्यातील बेबड ओहोळ या शाखेतील लॉकर सुविधेचे उद्घाटन करताना आमदार शेळके बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, सहकार महर्षी माऊली दाभाडे उपस्थित होते. तर याप्रसंगी माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, माजी सभापती एकनाथ टिळे, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव संतोष खांडगे, नंदकुमार शेलार, अशोकराव शेलार, शशिकांत हळदे, सरपंच तेजल घारे, पोलीस पाटील दुर्गा घारे, सुजित वाबळे, वेणुनाथ लांबे, विष्णुपंत वर्पे, मनोज ढमाले, दिलीप देशमुख, धनंजय घारे, मंगेश घारे, रणजीत घारे उपस्थित होते.
आमदार शेळके पुढे बोलताना म्हणाले की, पतसंस्था काढणे सोपे आहे, मात्र ती टिकविणे व तिची विश्वासार्हता वाढविणे हे अवघड काम आहे. तसेच राजकारण व सहकार क्षेत्र ही दोन्ही विभक्त असावीत असेही शेळके यांनी यावेळी सांगितले. दरम्यान माजी आमदार विलास लांडे, माऊली दाभाडे यांनीही मार्गदर्शन करताना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थेचे संस्थापक सुरेश वाबळे यांनी केले. स्वागत संचालक दादासाहेब उर्हे यांनी केले. सूत्रसंचालन संचालिका सुरेखा लवांडे यांनी केले, तर प्रा. विशाल वाबळे यांनी आभार मानले.





