Pimpri : शिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर स्वच्छता अभियान

पिंपरी : अस्तित्व फाउंडेशनच्या वतीने शिवजयंतीनिमित्त गडकिल्ले स्वच्छता अभियानांतर्गत आठव्या वर्षी शिवनेरी गडावर दिनांक ९ फेब्रुवारी रोजी “स्वच्छता मोहीम” आयोजित करण्यात आली. शिवनेरी गडावर आयोजित या अभियानात लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
स्वराज्यातील गडकिल्ले ही महाराष्ट्राची अस्मिता असून त्यांची स्वच्छता ही प्रत्येकाचे कर्तव्य आहे, किल्ल्यावर येणाऱ्या शिवप्रेमींना सुद्धा गड स्वच्छ ठेवण्यासाठी प्रेरित करण्यासाठी फाउंडेशनच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अस्तित्व फाउंडेशनचे अध्यक्ष चेतन बेंद्रे, नियोजन फाउंडेशनचे सदस्य खुशाल काळे आणि सुमित राक्षे, राजकुमार सांगोळे, रुषिकेश पाटील, प्रीतम पाटील, अथर्व ढवळे, सावन सांगोळे, निरंजन देवकर, विजय आगळे, हार्दिक गायकवाड, हर्ष मिरघे, प्रणव नवले, निलकंठ माने, कासलिंग गोरे, भूपेश गाजरे, अतुल ठाकरे, शंकर भिसे, विनायक भिसे, प्रशांत देशमुख, वैभव पाटणकर, खंडेराव लवटे, मोहित गौत्रे, ओम चव्हाण, नितीश काळे, लक्ष्मण देसाई, संकेत बोडके आदि सहभागी शिवप्रेमींनी गडावरून प्लॅस्टिक कचरा संकलित केला आणि गडकिल्ले स्वच्छतेसाठी प्रयत्नशील राहण्याची शपथ घेतली.





