Pimpri : चिखलीत दोन गटात तुफान हाणामारी परस्पर विरोधात गुन्हे दाखल

पिंपरी : किरकोळ कारणावरून दोन गटात मारहाण झाली. ही घटना रविवारी (दि. 16) रात्री सव्वादहा वाजताच्या सुमारास मोरेवस्ती चिखली येथे घडली.
अक्षय गुलाब जाधव (वय 26, रा. रुपीनगर, तळवडे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अजय हरिजन (वय 26, मोरेवस्ती चिखली) आणि त्याच्या दोन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय जाधव यांच्या सोसायटीमध्ये आरोपी अजय हा कार्यक्रमासाठी आला होता. अजय आणि त्याच्या दोन साथीदारांनी अक्षय यांच्या नातेवाईकाला शिवीगाळ केली. हे भांडण मिटवण्यासाठी अक्षय गेले असता त्यांना आरोपींनी मारहाण केली. आरोपींनी अक्षय यांच्या रिक्षाची तोडफोड केली.
याच्या परस्परविरोधात अजय रामपाल हरिजन यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अक्षय जाधव आणि त्याच्या दोन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अजय हे त्यांचा मित्र रोहित नकवाल याच्या घरी त्याच्या मुलीच्या नामकरणाच्या कार्यक्रमासाठी गेले होते.
तिथे आरोपींनी अजय यांचा मित्र कमलेश याच्यासोबत किरकोळ कारणावरून वाद घातला आणि त्याला मारहाण केली. त्यानंतर आरोग्य तिथून निघून गेले. आरोपी अक्षय आणि त्याच्या दोन साथीदारांनी पुन्हा मोरेवस्ती चिखली येथे येऊन अजय यांच्याशी वाद घातला. त्यांना मारहाण करून जखमी केले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.





