पिंपरी चिंचवडकरांची दिवाळी पहाट होणार सूरमयी

पिंपरी, (प्रतिनिधी) – भल्या पहाटे उठून केलेले अभ्यंगस्नान, दारात लावलेले दिवे, फराळाचा आस्वाद आणि सांगितीक मैफलीचा आनंद यांदाही घेता येणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेसोबतच विविध सामाजिक संस्था, सांस्कृतिक मंच व स्थानिक नेत्यांच्या या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच यंदा विधानसभाची निवडणूक दिवाळी नंतर असल्याने यंदा दिवाळी पहाटचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात पहावयास मिळणार आहेत.
गेल्या काही वर्षांपासून औद्योगिक नगरीत दिवाळी पहाटसारखे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. त्यांना शहरातील नागरिकांचाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. पुढील आठवड्यापासून सुरु होणाऱ्या दिवाळी पहाटसाठी आताच शहरातील नाट्यगृहांचे बुकिंग झाले आहे. यंदा धनत्रयोदशीपासूनच विविध सांगितीक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
यामध्ये रविवार (दि. २७) रोजी महेश गुरुजी हॅप्पीनेस क्लबॲन्ड इव्हेंट केशवनगर, कासारवाडी वतीने ‘दिवाळी पहाट २०२४’ तसेच बुधवार (दि. ३०) रोजी निगडी प्राधिकरण रेसिडेंट फोरमतर्फे गादिमा छोटे नाट्यगृह प्राधिकरण, निगडी, आणि गुरुवार (दि. ३१) रोजी पसायदान आयुर्वेद ॲण्ड पंचकर्म हॉस्िपटलतर्फे ‘दिवाळी सूरमयी पहाट’चे आयोन करण्यात आले आहे.
तसेच ज्ञान पबोधिनी निगडी केंद्र व मुक्ितसोपान संगीत विद्यालय आयोजित ‘दिवाळी पहाट’ मनोहर वाढोकर सभागृह, ज्ञान प्रबोधिनी निगडी येथे धनत्रोयदशी मंगळवार (दि. २९) रोजी होणार आहेत. तसेच दिवाळीनंतर विधानसभेच्या निवडणूका असल्याने आपल्या भागातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी लोकप्रिय कलाकारांच्या मैफली रंगणार आहेत. चिंचवड, निगडी, नवी सांगवी, पिंपळे सौदागर, भोसरी, पिंपळे गुरव या भागात या कार्यक्रमांची संख्या अधिक आहे.
निवडणुकीमुळे अधिक रंगत-
दरवर्षी प्रमाणे यंदाही विविध सामाजिक संस्था, सांस्कृतिक मंच, सोसायट्या, हॉस्िपटलतर्फे दिवाळी पहाट अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र यंदा दिवाळी पहाट या कार्याक्रमास जरा रंगत आली असून ही रंगत राजकीय नेत्यांनी वाढीवली आहे. त्यांचे कारणही साधे आहे. ते म्हणजे दिवाळी नंतर विधानसभा निवडणुक असल्याने ही रंगत अधिक वाढली आहे.
पालिकेच्यावतीने ‘दिवाळी पहाट’चे आयोजन
महापालिकेच्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमीच्या वतीनेही, ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शास्त्रीय गायन, वादन, जुगलबंदी यासारख्या विविध कला एकाच कार्यक्रमात रसिकांना अनुभवता येणार आहेत.
ग.दि. माडगूळकर नाट्यगृह, सेक्टर २६,मोरया पेट्रोल पंपाजवह, निगडी, प्राधिकरण येथे मंगळवार (दि. २९) रोजी शास्त्रीय गायन, अभंग नागेश आडगावकर आणि शास्त्रीय गायन, सुगम संगीत कलाकार अजितकुमार कडकडे आपली कला सादर करणार आहेत.





