पिंपरी : लाच थेट महिला वाहतूक पोलिसाच्या खिशात, व्हिडिओ व्हायरल….

Updated On:

पिंपरी (प्रतिनिधी) – पोलिसांमधील लाचखोरी हा नेहमीचा चर्चेचा विषय असतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनेक प्रयत्नांनंतर कर्मचारी मात्र रस्त्यावरील लाचखोरी सोडत नसल्याच्या घटना दिसून येतात. अशीच एक क्‍लिप सध्या पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या क्‍लिपमध्ये एक तरुणी थेट महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याच्या खिशामध्ये नोट ठेवताना दिसत आहे.

नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांच्या विरोधात पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांकडून जोरदार कारवाई सुरू आहे. सरकारच्या नियमानुसार पोलिसांना दंडाची रक्‍कम आता रोख स्वरूपात घेता येत नाही. त्यामुळे एटीएम कार्डद्वारे दंड स्वीकारला जातो. यामुळे लाचखोरीला आळा बसेल, असा सरकारचा भ्रम होता. मात्र लाचखोर नवनवीन युक्‍त्या शोधत असतात. पोलीस ठाण्यांमध्ये लाच स्वीकारण्यासाठी खासगी व्यक्‍तींची नियुक्‍ती केल्याचेही वेळोवेळी उघड झाले आहे.

पिंपरीतील शगुन चौकात एक अधिकारी आणि तीन कर्मचारी बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी एकत्र आले. त्यामध्ये एका महिला वाहतूक पोलीस कर्मचारी यांचाही समावेश होता. एका दुचाकीवरील दोन महिलांना वाहतूक पोलिसांनी अडविल्याचे त्या क्‍लिपमध्ये दिसून येत आहे. त्यापैकी एक तरुणी महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याच्या जवळ येते.

ती जवळ येताच महिला पोलीस तिला पाठमोरी होते. महिला पोलीस कर्मचाऱ्याने सूचना दिल्याप्रमाणे ही तरुणी महिला पोलिसाच्या मागच्या खिशात पैसे ठेवताना त्या क्‍लिपमध्ये दिसून येते. क्‍लिप काढणाऱ्या तरुणांचा आवाजही या क्‍लिपमध्ये ऐकायला येत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी याबाबत आता काय भूमिका घेतात, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

आणखी संबंधित बातम्या

Mahajyoti : महाज्योती चाळणी परीक्षेत पुण्यातील आंबेगाव केंद्रावर प्रचंड गोंधळ; परीक्षा रद्द, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

2026-10-07 18:28:17

Mahajyoti : महाज्योती चाळणी परीक्षेत पुण्यातील आंबेगाव केंद्रावर प्रचंड गोंधळ; परीक्षा रद्द, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Rohini Khadse And Chitra Wagh : 'काळ्याकुट्ट भुवया घेऊन...' रोहिणी खडसेंच्या टीकेला चित्रा वाघ यांचे प्रत्युत्तर

2026-10-07 12:41:42

Rohini Khadse And Chitra Wagh : 'काळ्याकुट्ट भुवया घेऊन...' रोहिणी खडसेंच्या टीकेला चित्रा वाघ यांचे प्रत्युत्तर

Pimpri-Chinchwad: चासकमानही हातातून जाणार? स्थानिकांचा पिंपरी-चिंचवडला पाणी देण्यास विरोध

2026-10-07 08:45:36

Pimpri-Chinchwad: चासकमानही हातातून जाणार? स्थानिकांचा पिंपरी-चिंचवडला पाणी देण्यास विरोध

Pune District : सोमेश्‍वरच्या शिवारात जगतापांपुढे आव्हान

2026-10-07 08:32:01

Pune District : सोमेश्‍वरच्या शिवारात जगतापांपुढे आव्हान

Graduate-Teacher Election: पदवीधर, शिक्षक निवडणूक शेवटच्या दिवशी १५४ अर्ज

2026-10-07 07:22:43

Graduate-Teacher Election: पदवीधर, शिक्षक निवडणूक शेवटच्या दिवशी १५४ अर्ज