Pimpri Chinchwad News : भोसरी परिसरातील गुरूवारी पाणीपुरवठा बंद
Pimpri Chinchwad News : पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी आणि लगतच्या परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे.

Pimpri Chinchwad News : चिखली जलशुद्धीकरण केंद्र येथे नवीन जलशुद्धीकरण केंद्रासाठी उच्चदाब वीजपुरवठा जोडण्यात येणार आहे. त्यासाठी वीजपुरवठा बंद करण्यात येणार असल्याने पाणीपुरवठा देखील बंद ठेवावा लागणार आहे. त्यामुळे गुरूवारी (दि. ३) शहरातील भोसरी परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. (Pimpri Chinchwad News)
नवीन जलशुद्धीकरण केंद्रासाठी विद्युतविषयक कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी कामे करताना कामगारांच्या व यंत्रणेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गुरूवारी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे चिखली जलशुद्धीकरण केंद्र येथून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. (Pimpri Chinchwad News)
परिणामी, गुरुवारी शहरातील बोऱ्हाडेवाडी, इंद्रायणीनगर, सेक्टर ४, ६, ९, ११ व १२, शीवरस्ता, चक्रपाणी वसाहत, धावडेवस्ती, मोशी, चऱ्होली, डुडुळगाव, चोवीसावाडी व इतर परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार असुन दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (दि.४) सकाळचा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून वापरावे असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे. (Pimpri Chinchwad News)



