पिंपरी-चिंचवड : आरटीओ परिसरात आग, दोन वाहने जळून खाक

Updated On:
पिंपरी-चिंचवड : आरटीओ परिसरात आग, दोन वाहने जळून खाक

पिंपरी (प्रतिनिधी) – मोशी येथील पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) परिसरात शुक्रवारी (दि. 5) दुपारी तीन वाजता आग लागल्याने दोन वाहने जळून खाक झाली. आग लागल्याची माहिती मिळताच टॅंकरचे पाणी मारुन नियत्रंण मिळवले. मात्र, काही वेळाने परत येथे भडका उडाला आणि दोन वाहने जळाली.

आरटीओ कार्यालयाच्या परिसरात विविध कारणाने जप्त केलेली सुमारे 159 वाहने कार्यालय परिसरात पार्क केलेली आहे. या वाहनालगत असलेल्या एका भिंतीजवळ कचरा साचला होता. या कचऱ्याला अचानक शुक्रवारी दुपारी आग लागली. येथे लावण्यात आलेल्या दोन बसलाही आग लागली. आग लागल्याने कार्यालय परिसरात एकच गोंधळ उडाला.

कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आधी आग विझवण्यासाठी आणलेले टॅंकर परत बोलावत आग विझवण्याचा प्रयत्न केला. अग्निशामक विभागाच्या दोन गाड्या आल्यावर आग पूर्णपणे आटोक्‍यात आली. याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी सांगितले की, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील आग विझविण्याचे प्रयत्न केले. दरम्यान दोन बसला नुकसान झाले.

अधिकाऱ्याने स्वत: हाती घेतली उपकरणे

दुसऱ्यांदा आग लागल्यावर आग आटोक्‍यात आणण्यासाठी आरटीओचे अधिकारी व कर्मचारी धावून गेले. सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेडशीकर यांनी अग्निशामक उपकरण हाती घेऊन दुसऱ्या वाहनाच्या टपावर  जाऊन आग विझवायला मदत केली.

त्यांना याबाबत विचारणा केली असता. ते म्हणाले की, कार्यालयावर आलेले संकट हे माझ्यावर आलेले संकट वाटले. कार्यालयाला हानी होऊ नये म्हणून मी स्वत: पुढाकार घेतला. येथील शेकडोच्या संख्येने असलेल्या वाहनांना वाचवणे अवघड झाले असते. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सहाय्यक उपप्रादेशिक अधिकारी सुबोध मेडशीकर व अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आणखी संबंधित बातम्या

Pimpri-Chinchwad: चासकमानही हातातून जाणार? स्थानिकांचा पिंपरी-चिंचवडला पाणी देण्यास विरोध

2026-10-07 08:45:36

Pimpri-Chinchwad: चासकमानही हातातून जाणार? स्थानिकांचा पिंपरी-चिंचवडला पाणी देण्यास विरोध

Hingoli News: हिंगोलीत फटाक्याच्या गोडाऊनला आग; दोन जणांचा मृत्यू, सात जण गंभीर जखमी

2026-10-06 13:40:59

Hingoli News: हिंगोलीत फटाक्याच्या गोडाऊनला आग; दोन जणांचा मृत्यू, सात जण गंभीर जखमी

Ranjangaon : सुपारी दिली मालकाच्या हत्येची अन् गोळ्या लागल्या निष्पाप कामगाराला; पाच जणांना अटक, दोघांचा शोध सुरू

2026-10-06 13:03:57

Ranjangaon : सुपारी दिली मालकाच्या हत्येची अन् गोळ्या लागल्या निष्पाप कामगाराला; पाच जणांना अटक, दोघांचा शोध सुरू

Pune Graduate constituency Election 2026: पुणे पदवीधरच्या जागेवरून महायुतीत मिठाचा खडा?

2026-09-30 08:21:32

Pune Graduate constituency Election 2026: पुणे पदवीधरच्या जागेवरून महायुतीत मिठाचा खडा?

Pimpri-Chinchwad : गणेशोत्‍सवात पीएमपी, मेट्रोची कोटीची उड्डाणे

2026-09-30 07:58:49

Pimpri-Chinchwad : गणेशोत्‍सवात पीएमपी, मेट्रोची कोटीची उड्डाणे
पिंपरी-चिंचवड : आरटीओ परिसरात आग, दोन वाहने जळून खाक - Dainik Prabhat