Pimpri-Chinchwad | पुनावळेतील प्रलंबित समस्यांतून राहुल कलाटेच करणार सुटका….

पिंपरी (प्रतिनिधी) – पुनावळे, रावेत भागातील नागरिकांची जीवघेण्या वाहतूक कोंडीतून सुटकेसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणारे, पुनावळेतील प्रस्तावित कचरा डेपो रद्द करण्यासाठी राज्य सरकारशी प्रखर यशस्वी लढा देणारे राहुल कलाटेच या भागातील अनेक वर्षांपासून प्रलंबित समस्यांपासून सुटका करू शकतात, असा विश्वास पुनावळेतील सोसायटीमधील भगिणींनी व्यक्त केला आहे.
राहुल कलाटे नेहमीच महिलांच्या सर्वांगीण विकासाचा विचार केला आहे. त्यातूनच चिंचवड विधानसभा क्षेत्रात ब्रेस्ट कॅन्सर जागृती अभियानातून तब्बल ५० हजाराहून अधिक बहिणींच्या आरोग्यासाठीचे शिबिर त्यांनी यशस्वीपणे राबविले. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नुकतेच महाविकास आघाडीचे चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार राहुल कलाटे यांनी पुनावळे – रावेतच्या विविध सोसायटीतील महिलां बहिणींसोबत संवाद साधला. यावेळी, विविध सोसायटीतील पदाधिकारी सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते. पुनावळे व रावेत परिसरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित समस्यांवर कोणीही ठाम भूमिका घेताना दिसत नसल्याच्या तीव्र भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.
“राहुलदादा सर्वांगीण विकासाचा विचार करू शकतात, त्यातूनच उद्याने, रस्ते इथपासून ते महिलांच्या आरोग्य शिबिरापर्यंत व्यापक उपक्रम त्यांनी राबवले आहेत. यातून त्यांची विकासाची दृष्टी दिसते. त्यामुळे यंदा आम्ही पुनावळे रावेतचा विकास करण्यासाठी राहुल दादांना खंबीर साथ देणार.”
– सारिका दर्शले, रहिवासी, पुनावळे
कचरा समस्या, वाहतूक कोंडी, महामार्गवरील अंडरपास रुंदीकरण, सेवा रस्त्यांची झालेली दुरवस्था, नसलेले फुटपाथ, उद्याने आणि इतर सुविधांचा अभाव अशा अनेक समस्यांमुळे आयटीयन्ससह स्थानिक नागरिक कमालीचे त्रस्त आहेत.
अनेक वर्षे इथले लोकप्रतिनिधी सत्तेत असूनही पूनावळे रावेत भागातील नागरी समस्या प्रलंबित आहेत. त्यामुळे, उच्च शिक्षित मतदारांसह स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे. उत्तम सुविधांसाठी यंदा चिंचवडमध्ये बदल करणारच असा ठाम विश्वास इथल्या सोसायटीधारकांनी व्यक्त केला. माझ्यासाठी ही दिवाळीची सर्वोत्तम भेट आहे. मीही दिलेल्या शब्दाला जागून पुनावळे-रावेत परिसराचा कायापालट करणारच
– राहुल कलाटे (उमेदवार महाविकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष)
इथल्या नागरी प्रश्नांसाठी कलाटे यांनी वेळोवेळी संबंधित विभागाला धारेवर धरून, पत्रव्यवहार करत समस्यांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे, आगामी काळात राहुल कलाटे हेच पुनावळेकरांची विविध समस्यांतून सुटका करू शकतात असा विश्वास सोसायटीमधील नागरिकांनी यावेळी व्यक्त केला.





