पिंपरी चिंचवड : मणिपूर हिंसाचाराच्या विरोधात निषेध आंदोलन

पिंपळे गुरव – विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती व इत्तर समविचारी संघटना यांच्या वतीने मणिपूर या राज्यामध्ये जो काही हिंसाचार चालू आहे, महिलांच्या बाबतीत जी काही किळसवणी हिंसा व अत्याचार करण्यात आले आहेत. त्या सर्व गोष्टींचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठमधील सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णकृती पुतळ्याजवळ निषेध सभा घेण्यात आली. या निषेध सभेमध्ये वेगवेगळ्या सामाजिक व राजकीय संघटनांनी सहभाग घेतला होता.
या वेळी या प्रत्येक संघटनेच्या प्रतिनिधींनी आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट केल्या. एकूणच संपूर्ण देशभरामध्ये जी काही हिंसा वाढत आहे, लोकशाहीच्या विरोधात केंद्र सरकार ज्या पद्धतीने काम करत आहे. त्या सर्व गोष्टींच्या विरोधात सर्वांनी एकत्र येऊन निदर्शन करण्यात आले. भारतीय संविधान आणि लोकशाही वाचली पाहिजे, समाजातील प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून जगता आले पाहिजे. त्यासाठी आमचा संघर्ष असाच चालू राहील.





