Pimpri-Chinchwad: शहरातही भात झोडणीला वेग; शेतकामासाठी मजूर मिळणे अवघड
Pimpri-Chinchwad: कापणी झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर झोडणी केल्यास दाण्यांचे नुकसान, बुरशी किंवा कीटकांचा प्रादुर्भाव टळतो.

पिंपरी – उद्योगांचे शहर म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये अजूनही काही पिंपरी-चिंचवडकरांनी आपल्या पारंपारिक शेतीची कास सोडली नाही. जमिनीला कोट्यवधीचा भाव आलेला असतानाही त्यावर उंच इमारती किंवा इतर उद्योग उभे करण्याएवजी शेती करणारे शेतकरी या शहरात अजूनही आहेत. अशाच शेतकरी कुटुंबामध्ये सध्या भात झोडणीच्या कामाला वेग आला आहे.
कापणी झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर झोडणी केल्यास दाण्यांचे नुकसान, बुरशी किंवा कीटकांचा प्रादुर्भाव टळतो. यामुळे सध्या भात झोडणीला वेग आला आहे.
भात झोडणी (मळणी) म्हणजे कापणी केलेल्या भाताच्या पेंढ्यांपासून दाणे वेगळे करण्याची प्रक्रिया. ही भातशेतीतील एक महत्त्वाची पायरी असून ती पारंपरिक आणि यांत्रिक अशा दोन्ही पद्धतींनी केली जाते.
कापलेले भात खळ्यावर आणून पेंढ्या हाताने किंवा लाकडी/दगडी साधनावर आपटून दाणे सुटे केले जातात. त्यानंतर वाऱ्यावर पाखडून दाणे आणि पेंढा वेगळा केला जातो.
यांत्रिक पद्धतीने देखील मळणी यंत्राच्या सहाय्याने कमी वेळेत आणि कमी कष्टात भाताचे दाणे वेगळे केले जातात. परंतु काही शेतकरी पारंपारिक पद्धतीचा अवलंब करतात. सध्याच्या काळात शेतकामासाठी मजूर मिळणे अवघड झाले असल्याने शेतकरी कुटुंब स्वत:च हे काम करत असते.
Rajgurunagar : नोटरी रजिस्टर तपासणीचे काम तालुकास्तरावर विभागून द्या





