Pimpri Chinchwad News : इराण-अमेरिका युद्धाचा उद्योगांना फटका! कच्चा माल महागला, निर्यात ठप्प; उद्योगनगरीत आर्थिक संकट?
Pimpri Chinchwad News : समुद्री मार्गाने होणारी आयात-निर्यात धोक्यात आल्याने पिंपरी-चिंचवडमधील इंजिनिअरिंग आणि ऑटोमोबाईल क्षेत्राला युद्धाची झळ बसत आहे.

Pimpri Chinchwad News – इराण-अमेरिकेच्या युद्धाचे परिणाम आता तीव्रतेने जाणवू लागले आहेत. इराणने समुद्री मार्गाने होणाऱ्या आयात-निर्यातीला युद्धाच्या सावटात आणले आहे. यामुळे जगभरातील मोठ्या भागातील उद्योग-व्यापारांना याचा फटका बसला आहे. उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात हजारो उद्योग कार्यरत आहेत.
यापैकी काही उद्योग आपली उत्पादने जगभरात निर्यात करतात. ही उत्पादने आकाराने आणि वजनाने मोठी असल्याने समुद्री मार्गाने वाहतूकच परवडणारी ठरते. वायुमार्गाने वाहतूक आर्थिक दृष्ट्या शक्य नाही. त्यातच समुद्री मार्गे वाहतुकीसाठी जहाजे तयार नसल्याने उद्योगांचे आर्थिक गणित विस्कळीत होत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात हजारो लहान-मोठे उद्योग आहेत. यापैकी बहुतेक उद्योग हे विविध देशातून येणाऱ्या कच्च्या मालावर अवलंबून आहेत. यात प्रामुख्याने अॅल्युमिनियम, तांबे, लोखंड हे धातू आहेत. तसेच वाहन उद्योगाशी निगडीत असलेल्या इलेक्िट्रक वस्तू देखील आहेत. या कच्च्या मालाची आयात ठप्प झाली असल्याने भविष्यातील आॅर्डरवर देखील परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
तिकडे गेल्या दोन महिन्यांपासून कच्च्ाा माल म्हणून वापरल्या जाणाऱ्या धातुंच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत होती. युद्ध स्िथतीमुळे या धातुंचे दर वेगाने वाढू लागले आहेत आणि उपलब्धता देखील कमी झाली आहे. गेल्या काही दिवसांतच सुमारे वीस टक्क्यांची वाढ झाली असल्याचे स्थानिक उद्योजक सांगत आहेत.
निर्यात थांबली
युरोप, अमेरिका, आफि्रका या खंडांसोबतच अरब देशांमध्येही पिंपरी-चिंचवडमधून मोठ्या प्रमाणात माल निर्यात केला जातो. यात इंजीनियरिंग पार्टस, प्लॅस्टिक आणि रबर पार्टस, वाहन उद्योगासाठी आवश्यक असणारे पार्टस, काही विशिष्ट केमिकल्स ही उत्पादने शहरातील उद्योग जगभरात पोहचवितात. ही निर्यात थांबली आहे.
यापूर्वी निर्यात केलेला काही माल कंटेनरमध्ये भरुन जेएनपीटी बंदरावर अडकला आहे तर काही माल पुढे गेला परंतु समुद्रात कुठे अडकला हे देखील उद्योजकांना माहीत नाही. या मालाबाबत देखील अनिश्चितता कायम आहे. हा माल पोहचला तर पुढील पेमेंट मिळू शकेल. परत आला तर या मालाचे काय करायचे असाही प्रश्न उद्योजकांना पडला आहे. कारण यापैकी बहुतेक माल मेड टू आॅर्डर आहे.
आर्थिक घडी विस्कळीत
तयार केलेला माल पुढे जाणार की नाही याबाबत काही शाश्वती नसल्याने अनेक उद्योगांनी उत्पादनाचा वेग आणि प्रमाण कमी केले आहे. पुढील आॅर्डरला देखील युद्धामुळे ग्रीन सिग्नल मिळत नसल्याने काम करावे की नाही? अशा द्विधा मनस्िथतीत उद्योजक आहेत.
कच्च्या मालाचे वाढते दर, आॅर्डरबाबत अनिश्चितता, ठप्प झालेली निर्यात यामुळे उद्योग जगतातील आर्थिक घडी आता विस्कळीत होताना दिसत आहे. परिस्िथती न सुधारल्यास उत्पन्न ठप्प आणि खर्च सुरू अशी परिस्िथती निर्माण होऊ शकते.
“युद्धामुळे आयात-निर्यातीशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या निगडीत असलेल्या उद्योगांवर सध्या संकट आहे. अनेक ठिकाणी काम बंद होण्याची परिस्िथती आहे. अनेक कंटेनर जेएनपीटी बंदरावर अडकले आहेत. तर काही समुद्री मार्गात कुठे अडकले आहेत. हे ही अनेक उद्योगांना माहीत नाही, यामुळे निर्यात थांबली आहे. कच्चा माल येत नसल्याने उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. आणखी काही दिवस युद्ध चालल्यास उद्योगांवर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.”
– संदीप बेलसरे, अध्यक्ष पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटना






