नायट्रोजन सिलिंडरच्या स्फोटात 3 कामगार जखमी

पिंपरी – चिखलीतील मोरया डाय कास्टर या कंपनी नायट्रोजन सिलिंडरचा भीषण स्फोट झाल्याने तीन कामगार जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. ही घटना शनिवारी (दि. 22) रात्री सव्वानऊच्या सुमारास घडली.

राहुल गौंड (वय-25, रा. कुदळवाडी) असे गंभीर झालेल्या जखमी कामगाराचे नाव आहे. त्याच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमी झालेल्या इतर दोन कामगारांची नावे समजू शकली नाहीत. शनिवारी कंपनीमध्ये सहा कामगार डाय बनवण्याचे काम करीत असताना हा स्फोट झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.