पिंपरी – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडीची पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभा मतदार संघानुसार कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. विभाग अध्यक्षा, उपविभाग अध्यक्षा, शाखा अध्यक्षांची मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नुकतीच निवड केली आहे.
पिंपरीतील मनसेच्या पक्ष कार्यालयात झालेल्या कार्यक्रमामध्ये महिला आघाडीच्या शहराध्यक्षा सीमा बेलापूरकर, माजी नगरसेविका अश्विनी चिखले, वडगाव नगरपंचायच्या माजी उपनराध्यक्षा सायली म्हाळसकर यांच्या हस्ते महिलांना नियुक्ती पत्र देण्यात आले. पिंपरी विधानसभा- उपविभाग अध्यक्षा म्हणून रत्ना कोहली, रेखा जम, सुनिता रणपिसे, किरण बंडवाल यांची तर शाखा अध्यक्षा म्हणून माधुरी चावरिया, योगिता कांबळे, वैशाली निजामपूरकर, नेहा पवार, हेमा ननावरे यांची निवड करण्यात आली.
भोसरी विधानसभा- विभाग अध्यक्षा म्हणून शितल कर्णावत, दक्षता क्षीरसागर यांची उपविभाग अध्यक्षा ज्योती सोनवले, स्वाती पांचाळ, पुनम भोकरे, सुनिता तोडकर, संगीता तुपे, सविता वैरागर, साधना भोसले, प्रतिभा दिंडोरे, शोभा बोदडे यांची तर मीनाक्षी तांबे, नीलम सोलापूरकर, वैष्णवी पंडित, शोभा उजगीरे यांची शाखा अध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आली.
चिंचवड विधानसभा- विभाग अध्यक्षा म्हणून वैशाली कोराटे, वैशाली बोत्रे यांची उपविभाग अध्यक्षा म्हणून संगीता कोळी, सीमा परदेशी, पूजा गायकवाड, योगिता विभुते यांची तर शाखा अध्यक्षा म्हणून अनिता नाईक, राधा साळुंखे, अमृता लांडगे, सुवर्णा सूर्यवंशी, चंद्रकला बोरदे, मनिषा बंगाळ, रिमता अंकुशे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.