Pimpri : रस्ते बांधणीत भोसरी विधानसभा मतदार संघाला झुकते माप

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अंदाजपत्रकात आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी शहरातील एकूण 34 डीपी रस्त्यांच्या कामाकरिता 809 कोटींची तरतूद केली आहे. यामध्ये भोसरी विधानसभा मतदार संघातील डिपी रस्त्यांकरिता 465 कोटी रुपये तर चिंचवड विधानसभा मतदारसंघातील रस्ते बांधणीकरिता 344 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भोसरी मतदार संघातील चिखली, मोशी, नाशिकफाटा, तळवडे या भागामधील 10 डीपी रस्त्यांचा समावेश आहे.
भोसरी मतदार संघातील चर्होली हा सर्वाधिक वेगाने नागरीकरण होणारा भाग म्हणून ओळखला जातो. तर मोशी, चिखली, तळवडे या भागातील नागरीकरणानेदेखील मोठा वेग घेतला आहे. त्यामुळे पालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयांतर्गत भैरवनाथ मंदिर ते विसावा चौक ते देहू-आळंदी रस्त्यापर्यंत 1200 मीटर लांबीच्या रस्त्याकरिता 28 कोटी,75 लाख, 78 हजार973 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याच क्षेत्रीय कार्यालयातील जाधववाडी सीएनजी गॅस पंप ते मोशी मार्केटपर्यंतचा 2550 मीटरच्या रस्त्याकरिता 39 कोटी 99 लाख,29 हजार468 रुपयांची तर रविरंजन वजन काटा ते नाशिक फाटापर्यंतचा रस्ता व इतर रस्ते विकसित करण्यासाठी 13 कोटी 53 लाख, 42 हजार 54 रुपयांची तरतुद केली आहे.
याशिवाय याच मतदार संघातील फ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असलेल्या प्रभाग क्र. 12 मधील त्रिवेणीनगर चौक ते तळवडे चौकापर्यंत 3200 मीटर लांबीचा 24 मीटरचा रस्ता विकसित करण्यासाठी 15 कोटी, 48 लाख, 91 हजार, 36 रुपय, प्रभाग क्र.1 चिखलीमधील देहू-आळंदी रस्ता ते सोनवणेवस्तीकडे जाणारा 30 मीटर रुंदीचा तर 1360 मीटर लांबीच्या रस्त्याकरिता 15 कोटी, 52 लाख, 4 हजार 6 रुपयांची तरतुद केली आहे. याशिवाय चिखलीतील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय ते संतपीठाकडे जाणारा 18 मीटर रुंदीचा रस्ता व इतर डिपी रस्ते 1530 मीारपर्यंत विकसित करण्यासाठी 23 कोटी 55 लकाख, 66 हजार292 रुपयांची तरतुद करण्यात आली आहे.
याच क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत असलेल्याब चिखली चौक ते सोनवणेवस्तीकडे जाणारा 24 मीटरचा 1150 मीटर लांबीच्या रस्त्याकरिता 23 कोटी, 23 लाख, 32 हजार, 586 रुपये, तळवडेमधील नदीकाठचा 12 व 14 मीटर रुंदीचा 2000 मीटर लांबीच्या रस्त्याकरिता 17 कोटी 87 लाख,35 हजार 547 रुपये, कॅनबे चौक ते स्पाइनरस्त्याला जोडणार्या 18 मीटर रुंदीचा 2615 मीटर लांबीच्या रस्त्यासाठी 18 कोटी 66 लाख, 71 हजार 454 रुपये तर साने चौक ते चिखली चौकादरम्यानच्या 1660 लांबीच्या रस्त्याकरिता 34 कोटी, 92 लाख, 23 हजार 660 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
इ क्षेत्रीय कार्यालयच्या हद्दीतील पुणे नाशिक महामार्ग ते स नं 575, 664, 508 व 506 पर्यंतचा 30 व 18 मीटरच्या 2320 मीटर लांबीच्या रस्त्यांसाठी 39 कोटी, 31 हजार, 263 रुपये, लाख, 32 हजार रुपये, मोशीतील स.नं. 575 ते 252 पर्यंत 30 मीटर रुंद व 996 मीटर लांबीच्या रस्त्यासाठी 23 कोटी, 21 लाख, 5 हजार 389 रुपये, डुडुळगावमधील मोशी आळंदी रस्ता ते गट क्र. 212 पर्यंतचा 18 मीटर रुंदीचा व 1950 लांबीचा, वडमुखवाडी गावठाणातील स.नं. 12 ते चर्होली गावठाण 18 मीटरचा 2110 मीटर लांबीच्या रस्त्याकरिता 31 कोटी 2 लाख, 6 हजार 923 तर दिघीतील प्रभाग क्र. 4 मधील नव्याने ताब्यात आलेला रस्ता 1390 मीटर लांब विकसित करण्यासाठी 15 कोटी, 56 लाख, 25 हजार, 962 रुपये तसेच मोशीतील स.नं. 575 ते 252 पर्यंतचा30 मीटर रुंदीचा व 2070 मीटर लांबीच्या रस्त्याकरिता 24 कोटी 65 लाख, 24 हजार,954 रुपयांची तरतुद केली आहे.





